
१९२० हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग ‘१९२० हॉरर ऑफ द हार्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कृष्णा भट्टने चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत ‘ट्रेलर आला आहे.. भीतीच्या अंधारात असेच काहीसे घडते..’ असे कॅप्शन दिले आहे.







