हिवाळ्यात तुम्हाला सुद्धा ‘ही’ लक्षणे जाणवत आहेत? आत्ताच सावध व्हा, नाहीतर…

0
12
हिवाळ्यात तुम्हाला सुद्धा ‘ही’ लक्षणे जाणवत आहेत? आत्ताच सावध व्हा, नाहीतर…


Winter Heart Care: हिवाळा ऋतु गुलाबी थंडीसह अनेक आजारही सोबत घेऊन येतो. तापमान कमी असल्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे सर्दी-खोकला, ताप, थकवा येणे, श्वसनाच्या समस्या यासह अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः हिवाळ्यात येणार्‍या थकव्याला दुर्लक्षित केले जाते. पण असे केल्यास हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source

 

थकवा जाणवणे:

हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढू लागतो, ज्यामुळे हृदयालाच्या कार्यात आणखी भर पडते आणि अधिक थकवा जाणवतो. पण अनेकजण रोजच्या धावपळीमुळे हा थकवा येत आहे असे समजून दुर्लक्ष करतात. तसेच हिवाळ्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यामुळे आणि रक्तदाब वाढल्यामुळेही या समस्येला सामोरे जावे लागते.

 

अचानक धाप लागणे:

हिवाळ्यात जलद गतीने चालल्याने किंवा पायऱ्या चढताना तुम्हाला धाप लागून श्वास घेण्यास त्रास होतो, पण थोडा आराम केल्यानंतर बरे वाटते. असे कधीतरी होत असल्यास सामान्य मानले जाऊ शकते. पण जर वारंवार तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे. असे होण्याचे कारण म्हणजे हृदयावरील दबावाचे प्रमाण वाढणे. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला त्याचे कार्य पार पाडण्यास अधिक कष्ट करावे लागतात. बऱ्याचदा थकवा येण्याचे हे लक्षण संसर्ग किंवा अस्थमाशी संबंधित असू शकते.

 

सतत येणारी सुस्ती:

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे सुस्ती येणे सामान्य आहे. पण सतत सुस्ती येत असेल तर या संकेताकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते शरीराला योग्य रक्तपुरवठा न झाल्यास अशक्तपणा जाणवून सतत सुस्ती येते. बऱ्याचदा ताण किंवा अपूर्ण झोप यामुळे असे होत आहे असे समजले जाते. पण हे हृदयविकाराच्या सुरूवातीची लक्षणे असू शकतात.

 

शरीराला येणारी सूज:

जेव्हा हृदय त्याच्या कार्यात असमर्थ ठरू लागतो तेव्हा शरीरात विशिष्ट द्रवपदार्थ जमा होण्यास सुरूवात होते. यामुळे शरीराला सूज येण्याची समस्या उद्भवते. तसेच हिवाळ्यात कमी तहान लागते, कमी प्रमाणात पाणी पिल्यास ही सूज आणखी वाढण्याची शक्यता असते.

 

हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे:

याशिवाय ज्या व्यक्तींना आधीच थायरॉईड किंवा हृदय विकाराच्या समस्या असतील त्यांना हिवाळ्यात हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे किंवा अनियमितता असणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी काहीवेळ आराम केल्यास देखील ठोक्यांची गती सामान्य होत नसेल तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.

 

तुम्हाला सुद्धा वरीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेट द्या. आणि वेळीच उपचार सुरू करा. अन्यथा सामान्य थकव्याचे रूपांतर पुढे गंभीर आजारात होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

 

 

1.प्रश्न: हिवाळ्यात सतत थकवा येणे सामान्य आहे का?

उत्तर: थोडासा थकवा सामान्य, पण सतत थकवा, सुस्ती असल्यास हृदयावर ताण वाढल्याचे लक्षण असू शकते; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

2.प्रश्न: पायऱ्या चढताना धाप लागणे म्हणजे काय?

उत्तर: हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला जास्त मेहनत करावी लागते; वारंवार धाप लागत असल्यास हृदयविकाराची सुरुवात असू शकते.

 

3.प्रश्न: हिवाळ्यात शरीराला सूज येण्याचे कारण काय?

उत्तर: हृदय कमकुवत झाल्यास शरीरात एक विशिष्ट द्रवपदार्थ साठतो; कमी पाणी पिणे आणि थंडी यामुळे सूज वाढते. हे हृदयाच्या समस्येचे गंभीर लक्षण आहे.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link