
PM Narendra Modi Interview: मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतली. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत ही माहिती दिली.
मागच्या 2 वर्षांपासून मी 2047 व्हिजन घेऊन मी काम करतोय. यात मला अजून खूप काम करायचं. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे. हे 15-20 लाख लोकांचं मत आहे. राज्यांनी यावर काम करावं. हे काम भाजपचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे. यानंतर मी नीती आयोगाची बैठक बोलवेन, असे ते म्हणाले. जनतेचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.
भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार आहे. मी पूर्ण प्लानिंग करुन हे प्रत्यक्षात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी ज्या राज्यात जातो तिथला ड्रेस परिधान करतो. यावर काहीजण टीका करतात. राजकारणात इतका द्वेश बरा नव्हे असे त्यांनी सांगितले.
राम मंदिर सरकारच्या नव्हे तर जनतेच्या पैशातून बनले आहे. पंतप्रधान म्हणून नाही तर मी रामभक्त म्हणून अयोध्येला गेलो होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोणाला डॉक्टर बनायचे असेल तर मातृभाषेत बना. सही करायची असेल तर मातृभाषेत सही करा असे मी सांगत असल्याचे ते म्हणाले.








