
Women Death Case: कर्नाटकमधील बेळगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा गळा दाबून खून केल्यानंतर हा सर्व प्रकार अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मोटारसायकलला बांधून मृतदेह ओढून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपाखाली पीडित महिलेचे सासरे आणि तिच्या पतीसहीत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मयत रेणुका मुलाला जन्म देऊ शकली नाही म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये कमन्ना (सासरे), जयश्री (सासू) आणि संतोष (पती) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं घडलं काय?
बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर एस. गुलेद यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. “शनिवारी संध्याकाळी ही भयानक घटना घडली. सुरुवातीला पोलिसांना एक फोन आला की त्यांच्या सूनेचा अपघात झाला आहे आणि तिचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघेजण मोटारसायकल होते. सासरे मोटरसायकल चालवत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी जयश्री आणि तिसरी व्यक्ती रेणुका बसली होती, असं सांगण्यात आलं” अशी माहिती गुलेद यांनी दिली. “रेणुका यांचे पाच वर्षांपूर्वी संतोषशी लग्न झाले. दुर्दैवाने, ती आजाराने ग्रस्त होती आणि ती आई होऊ शकत नव्हती,” असंही पोलिसांनी सांगितलं. “संतोषने अलीकडेच दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. दुसरी महिला गर्भवती आहे. दुसऱ्या लग्नानंतर, ते रेणुकाला घर सोडून जाण्यास भाग पाडत होते. पण ती तिथेच राहिली. तिच्या निर्णयामुळे तिची हत्या करण्यात आली,” असं पोलिसांनी सांगितलं.
चौकशीत समोर आलं सत्य
“चौकशीदरम्यान, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे संतोष देऊ शकला नाही. कमन्ना (सासऱ्या) वर संशय असल्याचे पोलिसांना समजले आणि पुढे आमच्या चौकशीदरम्यान, कमन्ना यांनी कबूल केले की त्यानीच सुनेचा गळा दाबला होता. सूनने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांनी तिची हत्या केली असं ते म्हणाले. प्रत्यक्षात असं घडलं की, संध्याकाळी जेव्हा ती मंदिरातून आली तेव्हा सासू-सासरे तिला बाईकवरुन घेऊन गेले. वाटेतच त्यांनी तिला ढकललं. जेव्हा ती खाली पडली पण तिचा मृत्यू झाला नाही. म्हणून, त्यांनी तिचा गळा दाबला आणि तिच्याच साडीने तिला मोटारसायकलला बांधले. अपघात आहे असं दाखवण्यासाठी सासू-सासऱ्यांनी तिची साडी बाईकला बांधून तिला 120 मीटर ओढत नेले. मात्र पुढील सहा तासांतच हा खून असल्याचे उघड झाले,” असं पोलिसांनी सांगितलं.
#WATCH | Belagavi, Karnataka: Three accused, who are in-laws and the husband of a woman, arrested for allegedly strangling her to death and dragging her by their motorcycle to make it look like an accident. As per Police, the murder was committed because the deceased, Renuka… pic.twitter.com/KezZBFumln
— ANI (@ANI) May 20, 2025
या प्रकरणामध्ये, “सासरे, सासू आणि नवऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कसून चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे,” असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.