
माधवीने सावनीला शिकवला धडा
पुरुला कोशिंबिर आवडते म्हणून माधवीने काकडी आणली असते. सावनी हीच काकडी घेते आणि फेकसपॅकसाठी वापरते. ते पाहून माधवी चिडते आणि सावनीला धडा शिकवते. ती मिरचीची धुरी बनवते. त्यामुळे सावनीला खोकला, शिंका येण्यास सुरुवात होते. सावनीला हे सहन होत नाही. मच्छरांच्या उपायासाठी हे केले असल्याचे माधवी सावनीला सांगते. तेवढ्यात मुक्ता घरात येते. मुक्ता सावनीची विचारपूस करत आजचा दिवस कसा गेला हे विचारते. पण, सावनी मुक्तावर चिडते आणि तू साळसुदपणाचा आव आणते. माधवीला मुक्ता बोलावून घेते आणि काय झाले हे विचारते. त्यावेळी माधवी मच्छरांना पळवण्यासाठी धूप केला असल्याचे सांगते. बोलण्याच्या ओघात मिरचीची धुरी असल्याचे ती सांगते. मुक्ताला माधवीने हे मुद्दाम केले असल्याचे कळते.
वाचा : सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया







