
खरंतर अर्जुन हा फार महागडा वकील असल्याने त्याची फी आपल्याला परवडणार नाही, असं सायलीने सुरुवातीलाच त्याला सांगितलं होतं. दुसरीकडे, अर्जुनला प्रियाशी लग्न करायचा नसल्याने त्याने सायलीच्या पुढ्यात लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हे लग्न केवळ एक करार असेल, मधुभाऊंची केस सुटेपर्यंत आपल्यातील हे कराराचे लग्न कोणालाही खोटं वाटता काम नये, आपण खऱ्या नवरा बायकोसारखं राहायचं, असं या करारात लिहिलेलं होतं. मधुभाऊ हे सायलीला तिच्या वडिलांसमान असल्याने तिने देखील अर्जुनची ही अट मान्य करत त्याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, हा लग्नाचा करार एक वर्षांसाठीच होता. दोघांच्या लग्नाला एक वर्ष आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरल्याप्रमाणे आता सायलीला अर्जुनचं घर सोडावं लागणार आहे.








