सातारा : सतुराचा धाक दाखवत केळी विक्रेत्याकडे खंडणीची मागणी | पुढारी

0
6









कराड, पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्यात हातगाडा व्यवसायिकांकडून खंडणीची मागणी करत हातगाड्यांचे नुकसान केल्याचे प्रकरण ताज्या असतानाच कराड शहरात पुन्हा एकदा हप्तेखोरीचा प्रकार समोर आला आहे. एका हप्तेखोराने चक्क सतुराचा धाक दाखवत केळी विक्रेत्यांकडे पैशाची मागणी केली. तसेच पैसे देण्यास नकार दिल्याने संबंधिताने केळी विक्रेत्याचे साहित्य विस्कटून टाकत नुकसानही केले. ही घटना गुरुवारी (दि.१०) सायंकाळी घडला.

याबाबत अधिकची माहिती अशी की, झोपडपट्टी परिसरातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी झाली असून तो व्यक्ती केळी विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, मागील काही दिवसांपासून एका संशयित सातत्याने येऊन त्या केळी विक्रेत्याकडे पैशाची मागणी करत होता. आपली परिस्थिती हालाखीची असून आपण हप्ता देऊ शकत नाही. दिवसाला फार तर शंभर रूपये मिळतात आणि यातून पैसे देणे शक्य नाही, असे म्हटल्यानंतर विक्रेत्याने संशयिताला सांगितले होते. त्यावेळी आपण पुन्हा पैशाची मागणी करणार नाही, असे संशयिताने आम्हाला सांगितले होते असे पोलिस ठाण्यात आलेल्या लोकांनी सांगितले.

गुरूवारी सायंकाळी पुन्हा तो संशयित हातात सतुर घेऊनच आला आणि त्याने थेट हप्ता देण्याची मागणी केली. त्याचवेळी त्याने विक्रीसाठी ठेवलेली केळी व अन्य साहित्य विस्कटून टाकले. हा प्रकार पाहताच परिसरातील युवकांसह महिलांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास पकडले. या कालावधीत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संबंधित संशयिताला ताब्यात घेत रात्री आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणले होते.

हेही वाचलंत का?











Source link