सातारा ; पुढारी वृत्तसेवा कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दोन एसटी अडकल्या आहेत. रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचे सकाळी निदर्शनास आले. कास बामणोलीकडे जाणारी एसटी चिखलात अडकली आहे. कासकडे जाणारा हा घाटाई रोड वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. कारण कास धरण भरल्यामुळे रस्त्यावर पाणी आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करून घाटई मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे.
हेही वाचा :
- Tiger Reserve | गोव्यात वाघ नाहीत असे कसे होईल?, भीमगड, तिळारी, म्हादई असा ३ राज्यांतून सुरु आहे वाघांचा स्थलांतराचा प्रवास
- Cricket World Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? जाणून घ्या कारण
- कारगिल विजय दिन : युद्ध व संरक्षणक्षमता वाढविण्याची गरज ; लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रेय शेकटकर
The post सातारा : कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला भेग; २ एसटी बस अडकल्या appeared first on पुढारी.







