कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड शहरातील गट नंबर 49 व 137 या दोन्ही गट नंबरमधील 80 गुंठे क्षेत्र टेंभू योजनेमुळे पाण्याखाली जात आहे. त्यामुळे तब्बल 20 वर्षांपासून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळालीच नाही. मागील वर्षी शासनाने या प्रस्तावांना मान्यता दिली असून 41 लाख रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र अजूनही भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे कराडमधील शेतकरी आंदोलनास बसले आहेत. शेतकरी संघटनेचे विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघदिप तांबवेकर, अरूण देशमुख, अविनाश तांबवेकर, सुर्येदय देशमुख यांच्यासह शेतकरी आंदोलन करत आहेत.
हेही वाचा :