
बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स आणि ब्रेकअप हे कायम जगजाहीर असतात. ९०च्या दशकातील अशीच एक जोडी म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि अभिनेत्री रवीना टंडन. त्यांचे अफेअर सर्वांना माहिती होते. त्या दोघांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र, अक्षय कुमारने ठेवलेल्या अटीमुळे रवीनाने लग्न करण्यास नकार दिला.






