MLA Manoj Ghorpade on Balasaheb Patil : मागील 4 दिवसापूर्वी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने 21-0 ने धुव्वा उडवत विद्यमान भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनलचा सुपडा साफ केला. यानंतर आमदार मनोज घोरपडे यांनी, सह्याद्री साखर कारखाना जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं नव्हे, असं वक्तव्य करत नाव न घेता बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली. तसेच पुन्हा विधानस,भा निवडणूक लढण्याचे आव्हान देखील दिले.
नेमकं काय म्हणाले मनोज घोरपडे?
9000 हजार सभासद आज देखील वारस नोंदी पासून वंचित आहेत. कारखान्यामध्ये वारस नोंदी करgन घ्या त्यानंतर इलेक्शन लावा त्यानंतर सर्वांना रिझल्ट कळेल. त्यानंतर मी ही पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊ शकता असे म्हणत बाळासाहेब पाटलांना घोरपडे यांनी आव्हानं दिले. आमदार मनोज घोरपडे यांचे विरोधकांना कारखाना निवडणुकीनंतर सडेतोड उत्तर दिले आहे.
सह्याद्री साखर कारखान्याच्या विजयानं मविआच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास वाढणार
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला. बाळासाहेब पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये कारखाना कार्यक्षेत्र पिंजून काढत त्यांच्या विरोधातील नरेटिव्ह खोडून काढण्यात यश मिळवल्याचं निकालातून पाहायला मिळालं. राज्यात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. सातारा जिल्ह्यात महायुतीनं सर्व जागा जिंकल्या. कराड उत्तरचे 5 टर्म आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांचा देखील पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक होती. सातारा लोकसभा मतदारसंघात मविआचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला एकाही मतदारसंघात यश मिळालं नाही. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानं मविआच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यात आहे. बाळासाहेब पाटील यांनी विजयी सभेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढायच्या आहेत, असं जाहीर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
ठोक आता शड्डू… सह्याद्रीतील विजयानंतरच्या मिरवणुकीतील ‘ते’ पोस्टर चर्चेत, बाळासाहेब पाटलांचा विजय साताऱ्यातील राजकारणात टर्निंग पॉईंट ठरणार?
अधिक पाहा..