
कर्करोग हा एक अतिशय गंभीर आजार असून दरवर्षी लाखो लोक कर्करोगामुळे आपले प्राण गमावत आहेत. बदलेली आणि खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या पिण्याचा सवयींमुळे गेल्या काही काळामध्ये कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढलेला दिसून आला आहे. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कर्करोग हा रोग ना श्रीमंत ना गरीब कोणालाही होऊ शकतो. कर्करोगाच्या विळख्यातून कोणीही वाचू शकत नाही. पोटाचा कर्करोग असल्यास शरीरात सकाळी उठल्यावर काही लक्षणं दिसतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास तुम्ही कर्करोगावर मात करु शकतात.
सकाळी उठल्यावर दिसतात ही लक्षणं!
जर पोटाचा कर्करोग असेल तर सकाळी काही लक्षणं दिसतात. बाथरूमला जाण्यापूर्वी तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणं दररोज जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे.
सकाळी पोटदुखी
सकाळी तीव्र पोटदुखी हे पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला दररोज सकाळी पोटदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
स्टूलमध्ये रक्त येणे
जर शौचास जाताना रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जलद वजन कमी होतं
जर तुमचे वजन कोणत्याही डाएट आणि वर्कआउटशिवाय झपाट्याने कमी होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोटात गॅस तयार होणे
जर तुम्हाला पोटात गॅस तयार होण्याची समस्या वारंवार होत असेल तर ते पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतं. जर तुम्हाला सतत पोट फुगणे आणि गॅस तयार होण्याच्या समस्येने त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जा.
भूक न लागणे
पोटात कर्करोग झाला की भूक कमी होऊ लागते. जर तुमची भूक कमी झाली असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही डॉक्टरकडे जावे.
ट्यूमर वेगाने पसरतो
पोटाचा कर्करोग खूप वेगाने पसरतो. पोटाचा ट्यूमर संपूर्ण शरीरात वेगाने पसरतो. पोटाचा कर्करोग रोखण्यासाठी, मद्यपान आणि धूम्रपान टाळा. जंक फूड आणि फास्ट फूड शक्य तितके कमी प्रमाणात खा. कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)