
मुलीची प्रकृती गंभीर बनल्यानंतर १० मार्चला सकाळी नागपूरला हलविण्यात आले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण एटापल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.




