
अशोक सराफ यांच्या कामाविषयी
अशोक सराफ हे लवकरच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबत कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले







