
या भांडणाबद्दल बोलताना सुनील ग्रोव्हर म्हणाला की, ‘आम्ही फ्लाइटमध्ये बसलो होतो आणि आम्हाला कळले की, नेटफ्लिक्स आता भारतात मोठा बिझनेस घेऊन येत आहे. त्यामुळे आता एखादा चांगला पब्लिसिटी स्टंट करावा लागेल, असं आम्हाला वाटलं. यानंतर आम्हा दोघांच्याही मनात हा भांडणाचा विचार आला. सहा वर्षांपूर्वी आमच्या फ्लाइटमध्ये जे काही घडले, ते या शोच्या पीआर स्टंटसाठी होते. जेणेकरून आम्हाला इतक्या मोठ्या व्यासपीठावर शो करण्याची संधी मिळेल.’








