विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह महत्वाची माहिती मिळणार आता मोबाइवर! MSBSHSE तयार केले ॲप

0
15
विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह महत्वाची माहिती मिळणार आता मोबाइवर! MSBSHSE तयार केले ॲप


MSBSHSE APP : दहावी बारावी या दोन्ही परीक्षा महत्वाच्या आहेत. या परीक्षांचे मुलांप्रमाणे पालकांना देखील चिंता असते. या परीक्षेसंबंधी अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकांना चुकीची माहिती मिळामुळे त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यांचा हा मनस्ताप कमी व्हावा व त्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांना रीतसर माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मोबाइल एमएसबीएसएचएसई अ‍ॅप तयार केले आहे. या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना वेळापत्रक, गुणपत्रिका, फी यासह अनेक महत्त्वाच्या परीक्षेशी संबंधित माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.



Source link