
महाराष्ट्रातकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांची समान विभागणी व्हावी.प्रत्येकी १२ जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित नरेंद्र मोदी यांचा पराभव करावा, असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज संभाजी नगर येथे सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संभाजी नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


