
“चला काम करूया. थोडी समानता असायला हवी,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई शहर आणि मुंबई जिल्हा उपनगरजिल्हाधिकाऱ्यांनी ४ जून चा संपूर्ण दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेनुसार, याचिकाकर्ते संघटनेने एप्रिल मध्ये मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि मुंबई जिल्हा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे ४ जूनचा संपूर्ण दिवस ड्राय डे म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे आदेश देण्यात आल्याने असा आढावा घेता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.