
शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याचे सर्रास दिसून येते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे घेत नाहीत किंवा अशा प्रवासासाठी मीटरप्रमाणे भाडे न घेता मनमानी पद्धतीने भाडे मागतात. अनेक रिक्षा चालक मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, अशा प्रकरणात तक्रार कोठे करायची याची माहिती नसल्याने प्रवाशांची कुंचबना होत होती.







