राम मंदिरात अचानक नमाज पठण करून लागले तीन वृद्ध व्यक्ती, पुजारीही झाले थक्क; काय होते कारण?

0
13
राम मंदिरात अचानक नमाज पठण करून लागले तीन वृद्ध व्यक्ती, पुजारीही झाले थक्क; काय होते कारण?


 मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील राम मंदिरात तीन मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सालसालाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किलोडा गावातील राम मंदिरात ही घटना घडली. मुस्लिम समाजातील तीन लोकांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करून नमाज पठण करण्यास सुरुवात केल्याची तक्रार मंदिराच्या पुजाऱ्याने सालसालाई पोलिस ठाणे गाठून दिली. हे तिघेही मंदिराजवळील बँकेत काही कामानिमित्त आले होते. बँकेतून बाहेर पडल्यावर नमाजची वेळ झाली होती, त्यामुळे त्यांनी तेथेच नमाज अदा केली.



Source link