रस्त्याकडेला खेळत असलेल्या २ वर्षाच्या चिमुकल्याला कारनं चिरडलं, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

0
18
रस्त्याकडेला खेळत असलेल्या २ वर्षाच्या चिमुकल्याला कारनं चिरडलं, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल


Accident in Karnataka : कर्नाटक राज्यातील बिदर शहरात रस्त्याकडेला खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला एका कारने चिरडले. यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, लहान मुलगा रस्त्याकडेला एका उभ्या असलेल्या कारजवळ खेळत होता. अचानक तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळीएका कारनेत्याला चिरडलं. स्थानिक लोक त्याच्याजवळ जाईपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. कारचालक घटनेनंतर न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी गांधीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link