
अखेर रॉकी आणि राणी आपले कुटुंब सोडून एकमेकांच्या कुटुंबियांसोबत राहण्याचा निर्णय घेतात. एकमेकांच्या घरच्यांशी जुळवून घेतलं तर लग्न होईल, नाहीतर वेगळे होतील असा निर्णय ते घेतात. जेव्हा रॉकी आणि राणी एकमेकांच्या कुटुंबात राहतात, तेव्हा त्यांना कळते की त्यांच्या दोन्ही कुटुंबात खूप ड्रामा आहे आणि आता त्यांचे लग्न होणे खूप कठीण आहे. मात्र, त्यातूनही ते मार्ग काढतात. त्यांच्या या प्रेमकहाणीत जया बच्चन व्हिलन बनणार आहेत.







