
ब्राझीलच्या एका जोडप्याने जगातील सर्वात यशस्वी लग्नाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ब्राझिलियन मॅनोएल अँजेलिम डिनो (१०५) आणि मारिया डो सूसा डिनो (१०१) यांच्या लग्नाला ८४ वर्षे झाली आहेत. १९४० मध्ये या दोघांचे लग्न पार पडले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लॉन्गीक्वेस्टने त्यांच्या लग्नाची पडताळणी केली आहे. या वेबसाईटवर १०० वर्षांहून अधिक काळ जगलेल्या लोकांची माहिती आहे. या दोघांच्या लग्नाला ८४ वर्ष ७८ दिवस झाले आहेत.