या आठवड्यात एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट येतायत प्रेक्षकांच्या भेटीला! तुम्ही कोणता बघणार?

0
12
या आठवड्यात एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट येतायत प्रेक्षकांच्या भेटीला! तुम्ही कोणता बघणार?


परंपरा

समाजात फार पूर्वीपासून काही प्रथा आणि परंपरा चालत आल्या आहेत. पुढच्या पिढ्या देखील अगदी डोळ्यांवर पट्टी बांधून या प्रथा आणि परंपरा पाळत असतात. अशा कितीतरी प्रथा काळानुसार कलाबाह्य ठरल्या असल्या तरी, देखील केवळ आपल्या पूर्वजांनी सांगितल्या म्हणून आपण त्या पाळत राहतो. असाच एक विषय ‘परंपरा’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे कुटुंब, त्याचं जगणं आणि समाजाचा ताण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलेलं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्या मुख्य भूमिका असून, प्रकाश धोत्रे, अरुण कदम, किशोर रावराणे, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, नम्रता पावसकर, भूषण घाडी, जयराज नायर आणि जनार्दन परब यांच्या दमदार भूमिका दिसणार आहेत.



Source link