मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका… एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा VIDEO

0
13
मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत ‘आयटम साँग’चा तडका… एकनाथ शिंदेंच्या पहिल्याच सभेची रंगलीय राज्यात चर्चा; पाहा VIDEO


Item song in Eknath shinde sabha : राज्यात निवडणुकीचे वारे वाहत जोरदार वाहत असून दिवाळीनंतर आता प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारार्थ पहिली सभा घेत एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा श्रीगणेशा फोडला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला मात्र ही सभा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम साँगने करण्यात आल्याने सध्या याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची यंदाच्या विधानसभेसाठी ही पहिलीच जाहीर सभा होती.



Source link