
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताची आई माधवी गोखले यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे. आता हा अपघात कोणी केला आहे याचा छडा घेण्यासाठी सागरने एका माणसाला कामाला लावले आहे. त्या माणसाने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा फोटो सागरला पाठवला आहे. त्यामुळे सागरचे पुढचे पाऊल काय असणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







