
मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या मुदत ठेवींमध्ये तब्बल ६००० कोटींची घट झाली आहे. मुंबईकरांचा हा पैसा कुणाच्या घशात गेला, की जाहिरातबाजीवर खर्च केला गेला, याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. सध्या महापालिकेवर राज्य सरकारने नेमलेला प्रशासक असून या प्रशासकांच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सुशोभीकरण आणि जाहिरातबाजी यावर ही उधळपट्टी केल्याचा आरोपही मुंबई काँग्रेसने केला आहे.





