रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एका चित्रपटातील दृश्यात शम्मी कपूर.
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज शम्मी कपूर यांच्याबद्दल सांगणार आहे. मला आठवतंय, ही गोष्ट सन २००० च्या डिसेंबरमधील आहे. आम्ही ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात ‘ये है जलवा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. त्यात सलमान खान, अमिषा पटेल, अनुपम खेर आदी होते. मनमोहन देसाई यांचे पुत्र आणि शम्मी कपूर यांचे जावई असलेले केतन देसाई या चित्रपटाचे निर्माते होते.
शम्मी अंकलनीही ऑस्ट्रेलियात शूटिंगच्या ठिकाणी यावे म्हणून मी, सलमान आणि डेव्हिड साहेबांनी खूप आग्रह धरला. आमच्या हट्टासमोर शम्मी अंकलनी हात टेकले आणि ते ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्टला आले. त्यावेळी मला शम्मी अंकल आणि नीला अँाटी यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनेक गोष्टी आणि किस्से मी त्यांच्याकडून ऐकले. तेे मी तुम्हाला भविष्यात सांगेनच. आज शम्मी अंकलचा पोहायला शिकण्याचा किस्सा सांगणार आहे.
आम्ही सगळे जण वर्साचे हॉटेलमध्ये थांबलो होतो. एक दिवस स्विमिंग पूलच्या जवळ बसलो होतो. काही लोक पोहत होते. शम्मी अंकलनी मला विचारले, ‘तू का नाही स्विमिंग करत? जा तू पण कर..’ मी म्हणालो, “अंकल, मला पोहता येत नाही.’ शम्मी अंकल हसले आणि म्हणाले, ‘मियाँ, आम्ही तर स्विमिंग तुझ्या मध्य प्रदेशात शिकलो आहे.’ मी त्यांना ‘कसं काय?’ विचारलं तर ते म्हणाले, ‘मी आमच्या भाभी म्हणजे राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा भाभींसोबत मध्य प्रदेशातील रीवा इथे गेलो होतो. तिथं मला खूप छान वाटायचं.
छोटसं, मोकळं शहर, कमी लोकसंख्या, हिरवळ, नदी.. तिथेे माझी मैत्री कृष्णा भाभींचा छोटा भाऊ राजेंद्र नाथशी झाली. आम्ही दोघेही एकाच वयाचे म्हणजे साधारण १६ वर्षांचे होतो. तेव्हा आम्ही दोघेही जीपच्या ट्यूबमध्ये हवा भरून नदीत उतरायचो आणि त्यावरून पोहत पोहत नदी पार करायचो. बस्स.. असे करता करता एक दिवस ट्यूबशिवाय नदी पार करायला लागलो आणि पोहायला शिकलो. तुमच्या भोपाळमध्ये तर इतके अप्रतिम तलाव आहेत. मी तिथेही पोहलो आहे. या बाजूने उडी मारायचो अन् दुसऱ्या बाजूने निघायचो.
‘मला घोड्यांचा शौकही रीवामध्येच लागला,’ शम्मी अंकल सांगत होते. ‘कसा काय?’ विचारल्यावर ते म्हणाले की, “राजेंद्र नाथ, कृष्णा वहिनींचे वडील तेथे आय. जी. पी. होते. पोलिस दलातील घोडे खूप शानदार होते. त्यांच्यामुळे मला आणि राजेंद्रला त्या घोड्यांवरुन रपेट करायला मिळायची. आमची काळजी घेण्यासाठी सोबत पोलिसवालेही असायचे. एके दिवशी मी आणि राजेंद्र पोलिसांकडून घोडा घेऊन पळून गेलो. आम्ही वेगाने घोडा पळवत होतो. एके ठिकाणी उतारावर घोडा वाकला. मला असं काही होईल, याचा अंदाज नव्हता. मी खाली पडलो. सुदैवाने दुखापत झाली नाही.
शम्मी अंकल सांगत होते.. तसे पाहिले तर कृष्णा भाभींचे कुटुंब आमच्याप्रमाणे मूळ पेशावरचेच, पण ते रीवामध्ये स्थायिक झाले होते. मला माझा पहिला मित्र राजेंद्र नाथ मध्य प्रदेशात भेटला, मी मध्य प्रदेशातच पोहायला शिकलो, तिथेच पहिली घोडेस्वारी केली अन् पहिल्यांदा घोड्यावरून पडलोही मध्य प्रदेशातच.. असेे म्हणत ते मोठ्याने हसले नि स्वत:च एक शेर ऐकवला…
गिरते हैं शह सवार ही
मैदान – ऐ – जंग में,
वो तिफ़्ल क्या गिरे
जो घुटनो के बल चले।
राजेंद्र नाथ हे प्रेम नाथ यांचे छोटे भाऊ आणि शम्मी हे राज कपूर यांचे छोटे भाऊ होते. त्यामुळे शम्मी कपूर आणि राजेंद्र नाथ यांची खूप घट्ट मैत्री झाली, ती अखेरपर्यंत टिकून राहिली. राजेंद्र नाथ यांना शम्मी कपूर यांच्या सांगण्यावरून शशिधर मुखर्जी यांचा “दिल दे के देखो’ हा चित्रपट मिळाला. नासिर हुसेन त्याचे दिग्दर्शक होते. या चित्रपटातील त्यांचा अभिनय, त्यांचे काम लोकांना खूप आवडल. त्यानंतर राजेंद्र नाथ हे लोकांचे आवडते स्टार झाले. राजेंद्र नाथ आणि शम्मी कपूर यांनी पुढे बऱ्याच चित्रपटांत काम केले.
शम्मी अंकल सांगत होते.. आम्ही दोघेही स्टार झालो होतो तेव्हाची गोष्ट. “राजकुमार’मधील गाण्याचे शूटिंग सुरू होते. साधनाचे एक गाणे होते “आजा आयी बहार, दिल है बेकरार..’ रीवानंतर पहिल्यांदाच या शूटिंगच्या वेळी मी आणि राजेंद्र नाथ एकत्र तलावात पोहत होतो. त्या गाण्यात आम्हाला सारखं अंडरवॉटर जायचं होतंं. मग ते जुने दिवस आठवून एकमेकांना म्हणायचो की, आठवतंय ना? आपण रीवामध्ये एकत्र पोहलो होतो आणि आजही दोघेच पोहतोय.. लहानपणीच्या त्या आठवणीत मग आम्ही यथेच्छ डुंबलो. आज शम्मी कपूर यांच्या आठवणीत त्यांच्या “तीसरी मंज़िल’मधील हे गाणे ऐका.
दीवाना मुझ सा नहीं,
इस अम्बर के नीचे,
आगे है क़ातिल मेरा
और मैं पीछे पीछे।
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.







