
एटीएसनेही अनेक मंत्र्यांना सांगितलंय की, तुम्ही तुमच्या लोकांना सावध करा. कारण काही विदेशी शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा मित्र, निकटवर्तीय किंवा कार्यालयातील कर्मचारी यांचा वापर करतात. त्यांना काही क्लिप पाठवल्या जातात, संबंधित क्लिप डाऊनलोड करायला सांगितलं जातं, त्यानंतर संबंधित मोबाईल तुमच्या आसपास असला तरी तुमची प्रत्येक गोष्ट पाकिस्तानपर्यंत पोहोचते. त्यामुळे अनेक लोकांना सावधान केलं आहे, अशी खळबळजनक माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.






