महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच…

0
19
महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच…


लक्ष्याला पडद्यावर परत आणणारच!

पुढे महेश कोठारे म्हणाले की, ‘धुमधडाका, झपाटलेला, पछाडलेला, थरथराट अशा अनेक चित्रपटात आम्ही एकत्र काम केले. मात्र पछाडलेला हा चित्रपट आमचा एकत्र असा शेवटचा ठरला. पछाडलेला प्रदर्शित झाला आणि त्याच वर्षी लक्ष्या गेला. मात्र, आता मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करायची इच्छा आहे आणि म्हणूनच मी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्मीकांतला रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी लक्ष्याला मोठ्या पडद्यावर आणणारच, हे तर मनाशी पक्कं केलं आहे.’ आता महेश कोठारे यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. दोघांची जोडी आता कुठल्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार, याची आतुरता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.



Source link