महामार्गांवरील वाढत्या अपघातांसाठी पोलीस व आरटीओ कर्मचारी जबाबदार! ‘समृद्धी’च्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह

0
14
महामार्गांवरील वाढत्या अपघातांसाठी पोलीस व आरटीओ कर्मचारी जबाबदार! ‘समृद्धी’च्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह


राज्यातील महामार्गांवरील अपघातांमध्ये वाढ झाली असून राज्यात रस्ते अपघातात १५,२२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांसाठी अनेक कारणं असून अनेकदा महामार्गांवरील वळणांवर, उतारांवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी दडून बसलेल्या पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांमुळेही अपघात होत असल्याचा ठपका आमदार सत्यजीत तांबे यांनी ठेवला आहे. अचानक पोलीस दिसल्याने वाहन थांबवताना किंवा पोलिसांच्या भीतीने वाहन जोरात दामटताना अपघात होत असून याबाबत पोलिसांना काही सूचना अथवा नियमावली करणार का, असा प्रश्नही आ. तांबे यांनी उपस्थित केला.



Source link