महात्मा फुले जन आरोग्यची मर्यादा 5 लाखांवर; कॅन्सर रुग्णांना होेणार फायदा | पुढारी

0
4









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरीब जनतेसाठी वरदान ठरत आहे. या योजनेतून दरवर्षी हजारो रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. योजनेत उपचाराच्या खर्चाचा भार राज्य सरकार उचलत असून आता उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना या योजनेचा फायदा होणार आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू झाली आहे. सध्या राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते. या योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून 5 लाख करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.

सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपरुग्णालये तसेच निवडक खासगी रुग्णालये अशा 27 रुग्णांलयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारक, 1 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे, आयकर दाते वगळून शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.











Source link