‘महाज्योती’च्या UPSC, MPSC पूर्व प्रशिक्षण परीक्षेत गैरप्रकार; एजन्सीचे टेंडर रद्द, पुन्हा होणार परीक्षा

0
18
‘महाज्योती’च्या UPSC, MPSC पूर्व प्रशिक्षण परीक्षेत गैरप्रकार; एजन्सीचे टेंडर रद्द, पुन्हा होणार परीक्षा


महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) आयोजित एमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षण पूर्वपरीक्षेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याने महाज्योतीने प्रवेश परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा कार्यादेश रद्द केला आहे. आता पुन्हा नव्याने परीक्षा होणार आहेत.  महाज्योतीने संबंधित एजन्सीचा करार रद्द केल्याने एजन्सीला ९३ लाख रुपयांचे नुकसानही सहन करावे लागले आहे. परीक्षेचे काम नव्या एजन्सीकडे सोपविण्यासोबतच महाज्योतीने परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. राज्यात जवळपास ६६ हजार उमेदवारांनी  UPSC आणि MPSC  पूर्व प्रशिक्षण परीक्षा दिली होती. आता त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.



Source link