
काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाने १५८ टक्के परतावा मिळवून देणारा सर्वात यशस्वी मराठी चित्रपट ठरला होता. सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री-पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत काम केले होते. पण विशेष म्हणजे दमदम दम दम दम दम डुमरू वाजे या गणपती गाण्यात त्यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकरची विशेष उपस्थिती होती. आता श्रियाने या गाण्यावर वक्तव्य केले आहे.





