भूतबाधा झाल्याचे सांगून मांत्रिकाने अल्पवयीन मुलीला एकांतात बोलावले अन् केलं घाणेरडं काम

0
23
भूतबाधा झाल्याचे सांगून मांत्रिकाने अल्पवयीन मुलीला एकांतात बोलावले अन् केलं घाणेरडं काम


हे प्रकरण भदोही जिल्ह्यातील आहे. सीतामढी परिसरात राहणाऱ्या महिलेने पोलिसात दाखल तक्रारीत म्हटले आहे की, तिची मुलगी सतत आजारी असते. १२ ऑक्टोबर रोजी कलिंजरा येथील मांत्रिक मोतीलाल गौतम त्यांच्या घरी आला होता. त्याने सांगितले की, १४ वर्षीय मुलीला भूतबाधा झाली आहे. त्यामुळेच ती सतत आजारी असते. महिलेसह तिचे कुटूंबीयही मांत्रिकांच्या बोलण्याला फसले. याचा फायदा घेत त्याने त्यांच्याकडून चार हजार रुपये उकळले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला पित्यासोबत गावातील एका मंदिरात बोलावले. तेथे त्याने मुलीचा विनयभंग करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 



Source link