भयानक! इंग्रजी येत नसल्यानं चौथीतल्या मुलीला अमानुष मारहाण; शिक्षिकेनं अक्षरश: डोक्यावरचे केस उपटले!

0
52
भयानक! इंग्रजी येत नसल्यानं चौथीतल्या मुलीला अमानुष मारहाण; शिक्षिकेनं अक्षरश: डोक्यावरचे केस उपटले!


Madhya Pradesh Teacher Beaten Class 4th Girl: मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये एका शिक्षिकेने इयत्ता चौथीतील विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केली. आमला ब्लॉकच्या खेडली बाजार प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला इंग्रजी येत नसल्याच्या कारणावरून प्रथम मारहाण केली. त्यानंतर तिचे केस ओढले. यामुळे विद्यार्थिनीच्या डोक्यावरचे बरेच केस उपटले गेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित शिक्षिकाविरोधात तक्रार दिली. आरोपी शिक्षिकाविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे अश्वासन पीडित मुलीच्या आई- वडिलांना देण्यात आले.



Source link