
‘ती फुलराणी’ पुन्हा होणे नाही, असे अनेकदा म्हटले जाते. पण हे वाक्य अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्यासाठी घेतले जाते. एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं होत कि, ‘भक्ती बर्वे भारतच नाही तर जागतिक रंगभूमीवरील मी पाहिलेली सर्वात श्रेष्ठ अभिनेत्री आहे.’ रंगभूमीवरील सम्राज्ञी, म्हणून भक्ती बर्वे यांची ओळख होती. पु. ल.देशपांडे यांची “फुलराणी ” भक्ती बर्वे यांनी जीवंत केली होती. त्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी फुलराणी साकारली पण भक्तीची सर कुणालाही आली नाही. मराठी, हिंदी गुजराती रंगमंचावर त्यांचे नाव मोठे होते. पण तुम्हाला माहिती आहे का भक्ती बर्वे यांच्या निधनाशी दिग्दर्शक








