बॉलिवूडचा ‘जंपिंग जॅक’ अभिनेता जितेंद्र यांच्याबद्दल ‘या’ रंजक गोष्टी माहितीयेत का?

0
14
बॉलिवूडचा ‘जंपिंग जॅक’ अभिनेता जितेंद्र यांच्याबद्दल ‘या’ रंजक गोष्टी माहितीयेत का?


अभिनय आणि डान्स करणारा बॉलिवूडचा ‘हिरो’!

जितेंद्र यांचा ‘गीत गाया पत्थरों ने’ हा चित्रपट आला आणि सुपरहिट झाला. यानंतर जितेंद्र यांनी व्ही. शांताराम यांचा दुसरा चित्रपट ‘फर्ज’ केला आणि तोही हिट झाला. यानंतर, जितेंद्रने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ६०च्या दशकात, या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत एंट्री केली. जितेंद्र चांगला अभिनय तर करतच होते. मात्र, सोबतच ते चांगले नृत्य देखील करत होते. जितेंद्र यांनी १९६४मध्ये आलेल्या ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ‘फर्ज’, ‘हमजोली’, ‘जीने की राह’, ‘तोहफा’, ‘हिम्मतवाला’, ‘धरम-वीर’, ‘औलाद’, ‘हातीम ताई’, ‘आशा’, ‘जानी दुश्मन’, ‘परिचय’, ‘खुशबू’, ‘संजोग’, ‘एक ही भूल’, ‘घर संसार’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.



Source link