बीड : अंबाजोगाई-आडस रस्त्यावरील उमराई पाटीजवळ बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात इर्टिगा कार पलटून झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एक कुटुंब विवाहासाठी इर्टिगा कारमधून (एमएच 05 सीव्ही 9186) अंबाजोगाई येथे येत होते. यावेळी उमराई पाटी परिसरातील दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक कारसमोर आला. याच दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.
या अपघातात शौकत अहमद शेख (वय 46) आणि खय्युम अब्बास अत्तार (वय 45) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Karad Accident : कराडजवळ दोन तरुणी ठार
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील आटके गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या दोन तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली. करिष्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असं अपघातात ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत. या अपघातानंतर लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली.
नांदुराजवळ मंगळवारी पहाटे अपघात
बुलढाण्यातील नांदुरा शहरात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात घडला. पहाटे साडेचार वाजता नांदुरा शहराजवळ आर्टिगा कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपुरातही अपघात, तिघांचा मृत्यू
चंद्रपूर शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टाटा मॅजिक वाहनाला ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात टाटा मॅजिकच्या ड्रायव्हरसह 3 जणांचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रपूर (Chandrapur) प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.
अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात निर्दोष मोहूर्ले (ड्रायव्हर), मनाबाई सिडाम (65) आणि एक प्रवासी असे एकूण तिघे मृत्यू झाल्याची घटना घडली.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..