
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा (Rekha patra) यांच्याशी फोनवर संवाद साधला. रेखा पात्रा यांनी संदेशखलीमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली होती. पंतप्रधान मोदींनी त्यांना “शक्ति स्वरूपा” (shakti Swaroopa) म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. मोदींनी त्यांच्या प्रचाराची तयारी, लोकांमध्ये भाजपाप्रति असलेले समर्थन व अन्य मुद्द्यांवर बातचीत केली. यावेळी रेखा पात्रा यांनी संदेशखलीमध्ये महिलांसमोर येणाऱ्या समस्यांशी मोदींना अवगत केले.







