
बॉलिवूडमध्ये घेतली एन्ट्री
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त शिवाजी साटम यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १९८८मध्ये ‘पेस्टनजी’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर शिवाजी साटम यांनी ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘सूर्यवंश’, ‘वास्तव’, ‘पुकार’, ‘नायक’, ‘गर्व’ आणि ‘टॅक्सी नंबर ९२११’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलिवूड आपले विशेष स्थान निर्माण केले. शिवाजी साटम यांनी हिंदीशिवाय मराठी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.






