फादर्स डे निमित्त ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेने वडिलांना दिला खास संदेश

0
18
फादर्स डे निमित्त ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अक्षय म्हात्रेने वडिलांना दिला खास संदेश


पुढे अक्षय वडिलांविषयी बोलताना म्हणाला की, “माझं आणि माझ्या बाबांचं नातं थोडं वेगळं आहे. लहानपणी बाबांसोबत तसं मैत्रीच नातं नव्हतं. माझे बाबा थोडे कडक शिस्तीचे होते म्हणून लहानपणी आमच्या गप्पा आणि बोलणं तसं नव्हतं आणि मी ही थोडा शांत होतो. आमचं नातं माझ्या वयाच्या २० व्या वर्षांमध्ये मध्ये खुलत गेलं आम्ही वेगवेगळ्या विषयवर बोलू लागलो मग ते सिनेमा, राजकरण किंवा रोजच्या आयुष्याच्या घडामोडी असो. आता अशीवेळ आली आहे की मी माझ्या आईपेक्षा बाबांशी तासंतास बोलतो. बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे ते न बोलता खूप काही करुन जातात, त्यांच गोष्टींकडे बारीक लक्ष असतं कोणाला काही मदत लागणार असेल किंवा घरात कश्याची गरज असेल ते बरोबर लक्ष देऊन ती गरज पूर्ण करतात. कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत माझे बाबा. ते माझं कौतुक असं बोलून करत नाही पण मला माहिती आहे की त्यांनी बोलून जरी नाही दाखवलं तरी त्यांना माझा अभिमान आहे आणि मी ही असंच उत्तम काम करून त्यांना अभिमान बाळगण्याची कारणे देत राहायचा प्रयत्न करत आहे. ते कधी ना कधी मला शाबाशकी नक्की देतील ह्याची मला खात्री आहे. बाबांना इतकंच बोलू इच्छितो ‘आय लव्ह यु बाबा’ आणि हैप्पी फादर्स डे!”
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार ‘या’ चित्रपटात



Source link