
श्रीनू साजरा करू शकेल का ओवीचा वाढदिवस?
दुसरीकडे, श्रीनूच्या हृदयात ओवी आहे याची कल्पना खोत कुटुंबाला नाही. पण, चारूच्या मनात श्रीनू भरलाय, हे ती मंजूशी बोलताना सतत त्याचा उल्लेख करते. दादाखोत सुद्धा चारूसाठी स्थळं बघत आहेत. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. त्यातून लालीसुद्धा मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे. अशातच ओवीचा वाढदिवसही येणार आहे. चारुला एव्हाना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेली आहे. त्यामुळे ओवीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता येऊ नये, याच्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे सगळं चालू असताना दुसरीकडे निशी आणि नीराजचे लग्न विधी सुरू होणार आहेत. खूप दिवसांनंतर खोतांच्या घरात एक मंगल कार्य पार पडत आहे, म्हणून सगळे आनंदात आहेत.








