
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ पाहिली जाते. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना या पात्रांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र मालिकेचा शेवट काय होणार याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार.