पॅलेस्टाइनच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदी बोलले; मानवतेच्या आधारावर मदत करण्याच आश्वासन

0
16
पॅलेस्टाइनच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदी बोलले; मानवतेच्या आधारावर मदत करण्याच आश्वासन


इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधली अतिरेकी संघटना हमास यांच्यादरम्यान गेल्या १२ दिवसांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. या संघर्षात तीन हजारपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले असून १२ हजार नागरिक जखमी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी काल, बुधवारी एक दिवसाचा इस्त्रायलचा दौरा केला. युद्ध काळात इस्त्रायलमध्ये जाणारे पहिले राष्ट्रपती ठरले. बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू यांची भेट घेऊन ‘हमास’विरोधी लढ्यात पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आज, गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुद्धा इस्त्रायलमध्ये दाखल झाले. ‘हमास’विरोधी लढ्यात ब्रिटन इस्त्रायलच्या पाठिशी उभा असल्याचं सुनक यांनी यावेळी सांगितलं.



Source link