
पिंपरी चिंडवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज (सोमवार, २५ डिसेंबर) शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. लवकरच ते हातात शिवबंधन बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे.







