पाठीराखा डोंगरच गावासाठी ठरला काळ, रुद्रप्रयामध्ये हाहाकार; दृश्य पाहून फुटेल किंकाळी!

0
2
पाठीराखा डोंगरच गावासाठी ठरला काळ, रुद्रप्रयामध्ये हाहाकार; दृश्य पाहून फुटेल किंकाळी!


Rudraprayag Cloudburst : उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाही. उलटपक्षी हा पाऊस आता स्थानिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकताना दिसत आहे. उत्तराखंडमध्ये अनेक गावांमधील नागरिक जीव मुठीत घेऊन जगताना दिसत आहेत. ज्या निसर्गाला त्यांनी पाठीराखा म्हणून मान दिला तोच निसर्ग आता उत्तराखंडमध्ये रौद्र रुप धारण करताना दिसत आहे.

Add Zee News as a Preferred Source

अख्खा गाव डोंगराखाली!

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील छेनागाड हे गाव डोंगरकड्यांच्या कपारीत वसलेलं एक सुरेख आणि शांत गाव. शेती आणि पशुपालनावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह. इथला निसर्गच खऱ्या अर्थानं येथील नागरिकांचा अन्नदाता. पण, 28 ऑगस्ट 2025 हा दिवस या गावासाठी काळरात्र आणणारा ठरला. बसुकेदार तालुक्यातील बडेथ डुंगर क्षेत्रात ढगफुटी झाल्यानं इथं सारंकाही उध्वस्त झालं.

‘हिमालयन त्सुनामी’सम संकट इथं ओढावलं आणि छेनागाड गावावर अख्खा डोंगरकडा कोसळला. सारी घरं वाहून गेली, कैक नागरिक बेपत्ता झाले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या आपत्तीनंतर केदारनाथ महामार्ग बंद करण्यात आला असून या भागात बचावकार्याला वेग देण्यात येत आहे. सोशल मीडियावर या गावाची आधीची आणि आता पूरानंतरची छायाचित्र समोर आली असून ही दृश्य पाहताना काळजाचा थरकाप उडत आहे.

एक होतं गाव…

या गावापासू निघणारे रस्ते NH, PWD, PMGSY नं जोडलेले असून केदारानाथला जाणारी वाटही इथून जात असल्यानं पर्यटकांचाही या गावाकडे ओघ होता. पण, 28 तारखेला सायंकाळी अचानकच ढगफुटी झाली. रुद्रप्रयाग आणि चमोली या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ढगफुटी झाल्यानं छेनागाडवर त्याचा गंभीर परिणाम दिसून आला. पाण्याचा प्रचंड लोंढा आणि माती, राडारोडा डोंगरकड्यावरून थेट भलामोठा कडा कापून गावावर कोसळला आणि वाटेत येणारं सारं गिळत गेला.

प्राथमिक माहितीनुसार या गावाच्या आजुबाजूच्या परिसरामध्येही मोठं नुकसान झालं असून चमोलीच्य देवाल क्षेत्र इथं पूराच्या पाण्यात आणि मातीच्या ढिगाऱ्यात 15-20 गुराखी दबले. केदारनाथ घाटी परिसरातील मोटर रोड ब्रिज वाहून गेला. पाहता पाहता अलखनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या पाणीपात्रांनी रौद्र रुप धारण केलं, ज्यामुळं अनेक रस्ते तातडीनं बंद करण्यात आले आणि माणसं होती तिथंच फसली.

दरम्यान उत्तराखंडमध्ये पावसानं प्रचंड नुकसान केलं असून मांगील कैक दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तातडीनं नियंत्रण कक्षाची स्थापना करचतमअयात आली. जिथं प्रभावित क्षेत्रांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत या राज्यात अडकलेल्या पर्यटकांनासुद्धा स्वगृही सुखरुप पाठवण्यासाठीच्या उपाययोजना राबवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार या भागामध्ये पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगावी. रुद्रप्रयाग आणि नजीकच्या भागांमधील शाळा, महाविद्यालयं तूर्तास बंद ठेवण्यात आल्या असून या आव्हानात्मक काळात यंत्रणांना त्यांच्या कामात सहकार्य करण्यातं आवाहन करण्यात येत आहे. 





Source link