पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 28 पर्यटकांना शहिदांचा दर्जा द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे मागणी!

0
4
पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 28 पर्यटकांना शहिदांचा दर्जा द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे मागणी!


Rahul Gandhi On Pahalgam attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्वाचे विधान केलंय. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर केंद्र सरकार जी कारवाई करेल, आम्ही त्याच्यासोबत असू, असे ते म्हणाले. तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीदाचा दर्जा देण्याची मागणीदेखील त्यांनी पंतप्रधानांकडे केली. 

भारतासोबत हे केलं जाऊ शकतं नाही. विरोधकांसोबतच्या बैठकीत आम्ही स्पष्ट भूमिका मांडलीय. जे झालंय ते स्वीकारार्ह नाही. नरेंद्र मोदींना अॅक्शन घ्यायची आहे. पूर्ण विरोधक तुमच्यासोबत आहेत,असे राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.  28 पर्यटकांचा यात मृत्यू झालाय. आमची मूल शहीद झाले आहेत, त्यांना शहीदाचा दर्जा द्यावा, असे मी पर्यटकांच्यावतीने तुम्हाला सांगत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 





Source link