पवार कुटुंबियांचा पाडवा दुभंगला! शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बाग, अजित पवारांच्या भेटीसाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी

0
16
पवार कुटुंबियांचा पाडवा दुभंगला! शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बाग, अजित पवारांच्या भेटीसाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी


Pawar Family Diwali Padwa in Baramati: दरवर्षी पवार कुटुंबीय हे एकत्र दिवाळी पाडवा साजरा करत असतात. मात्र, यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबियांचा पाडवा हा दुभंगलेला दिसला. पक्ष फुटला तरी पवार कुटुंबीय पाडवा एकत्र साजरे करतील असे कार्यकर्त्यांना वाटले होते. पण, शरद पवार यांनी हेममी प्रमाणे बारामती येथील गोविंद बागेत कार्यकर्त्यांशी भेटी गाठी घेऊन दिवाळी पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीत कार्यकर्त्यांची व समर्थकांच्या भेटीगाठी घेऊन दिवाळी पाडवा साजरा केला आहे. दरम्यान, या ठिकाणी देखील दोन्ही पवार निवडणुकीचा डाव टाकून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतांना दिसले.



Source link