
सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याचे वकीलांनी युक्तीवाद केला की, महिलेने स्वीकार केले आहे की, तिचे संजीवसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे हा आयपीसी कलम ४९४ व ४९७ नुसार गुन्हा आहे. वकीलांनी सामाजिक नैतिकतेचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करण्याचे अपील केले. सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा हवाला देताना एकसदस्यीय खंडपीठाने म्हटले की, हे सत्य आहे की, आमच्या समाजात हा विचार पक्का आहे की, शारीरिक संबंध केवळ पती-पत्नीमध्येच होतो. मात्र जेव्हा दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने विवाहबाह्य संबंध ठेवतात, तो गुन्हा ठरत नाही.







